युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी विटयाच्या युवकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 11 February 2026


सातारा  : सातारा शहरात एका नगरसेवकाने दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता तसेच दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पाठलाग करुन 21 वर्षीय युवतीचा पाठलाग करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी तुषार येवले रा. विटा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 21 वर्षीय युवतीच्या फिर्यादीवरुन ती शहरातील एका नगरसेवकाने आयोजित केलेल्या दांडियाच्या कार्यक्रमाला गेली होती. तेव्हा दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता तुषार येवले याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ती तिच्या घराकडे चालत निघाली असताना त्याने अडवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन अशी धमकी दिली. त्यावरुन तुषार येवले याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल या करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वळसे येथे ड्रायव्हरला मारहाण; बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पतीसह सासरा, सासूवर गुन्हा

संबंधित बातम्या