अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला सश्रम कारावास; वाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

by Team Satara Today | published on : 25 February 2026


सातारा  : पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावातील अल्पवयीन 15 वर्षीय मुलीवर घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार करीत व्हिडीओ, फोटो काढून प्रसारीत करण्याची धमकी दिल्याप्रकरणी 29 वर्षीय युवकाला बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत वाई येथील अतिरिक्त जिल्हा सञ न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी दोषी धरत 20 गरज वर्षे  सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंड सुनावला आहे. वसीम अकबर हुसेन रजा (वय 29)असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे. 

पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावात अल्पवयीन 15 वर्षीय मुलगी कुंटूंबियांसमवेत राहण्याकरीता आहे. वसीम रजा याने अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना घरात घुसून जबरदस्तीने शरीरसंबंध करीत जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईलवर व्हिडीओ, फोटो काढून प्रसारित करण्याची धमकी दिली असल्याची अल्पवयीन मुलीच्या आईने पाचगणी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो)अंतर्गत व आयटी कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावेळी घटनेचा तत्कालीन महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी तपास करत दोषारोपपत्र वाई जिल्हा न्यायालयामध्ये सादर केले होते. त्यानुसार वाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र  न्यायाधीश आर. एन. मेहरे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी पार पडत घटनेमध्ये 10 साक्षिदार तपासत सरकारी वकील दयाराम पाटील,महेश यु. शिंदे यांनी व फिर्यादीतर्फे विशेष वकील ऍड. दिनेश धुमाळ, ऍड.भारती कोरवाल यांनी केलेला युक्तिवाद केला. 


सादर केलेले पुरावे,साक्षिदार ग्राह्य मानत वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी वसीम रजा याला बलात्कारप्रकरणी व बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम (पोक्सो) अन्वये व आयटी अँक्टअंतर्गत दोषी धरत वीस वर्ष सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. 

याकामी सरकारी वकील दयाराम पाटील,महेश यु.शिंदे यांना पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधिक्षक डाँ.वैशाली कडुकर,वाई पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी तथा तत्कालीन पोलीस निरीक्षक संदिप भागवत, पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, न्यायालयीन प्राँसिक्युशन स्काँडचे पोलीस अंमलदार भुजंगराव काळे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव पांब्रे,अविनाश डेरे,पोलीस अंमलदार किर्तीकुमार कदम, सुधाकर सपकाळ, हेमा कदम, प्रितम नाळे, सोमनाथ कुंभार यांनी सहकार्य केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारे सहा जणांना फलटण व वाई येथून अटक; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
'एक पत्र तिच्यासाठी..!' अश्वमेधचा अभिनव उपक्रम; महिला दिनानिमित्त कै. सारिका मोहिते- यादव स्मृतिप्रीत्यर्थ अनोखी स्पर्धा

संबंधित बातम्या