सातारा : पोवई नाक्यावरील सयाजी विद्यालयासमोर रविवारी दुपारी कार अपघाताचा थरार झाला. कारचे टायर फुटून ती पलटी झाली असून यामध्ये तिघे जण जखमी झाले. दरम्यान, अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, कार राजवाडा दिशेने निघाली होती. रयत शिक्षण संस्था परिसरातील सयाजी विद्यालयासमोर कार आल्यानंतर त्याचा टायर फुटला. चालत्या कारचा अचानक टायर फुटल्याने कार चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. कार थेट दुभाजकावर गेली आणि त्यावरुन उलटी झाली.
अपघातात कारचे नुकसान झाले असून त्यातील तिघेजण प्राथमिक माहितीनुसार जखमी जखमी झाले आहेत. डोळ्यांदेखत कार पलटी झाल्यानंतर जाणारी-येणारी वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिस सागर गोगावले यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार बाजूला घेण्यात आली.