विरोधक जर आले तर पालिकेत पत्रकारांना टोल द्यावा लागेल; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा नरेंद्र पाटील यांना टोला

by Team Satara Today | published on : 02 December 2025


सातारा  : सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आठ नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगल्या मतांनी निवडून येतील. कारण लोक विकास कामांना बघून मत देतात. महाविकास आघाडीचे विरोधक पालिकेत यायला लागले तर पत्रकारांना सुद्धा टोल द्यावा लागेल, अशी खिल्ली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी उडवत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यावर टीका केली. सुवर्णाताई पाटील यांच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा नरेंद्र पाटील हेच आहेत असा टोमणा त्यांनी मारला. 

येथील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत सहभागी उमेदवारांना मत दिल्यानंतर शिवेंद्रसिंह राजे यांनी हाताचे बोट उंचावत मतदान केल्याचे पत्रकारांना सांगितले त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. 

ते म्हणाले, साताऱ्यात अपक्ष बंडखोरांची अवस्था म्हणजे प्रभागाचे नुकसान करण्याचा प्रकार आहे. प्रभागात मनोमिलनाचे उमेदवार पक्षाचे प्रतिनिधी आहेत. पक्षाच्या माध्यमातून सातारा शहरासाठी विविध विकास कामे होणार आहेत. अपक्षांना सातारकर साथ देणार नाहीत, अपक्ष हे प्रभागासाठी निधी आणू शकत नाहीत.  त्यामुळे लोकांच्या हिताचे नुकसान होते. आमची पक्षी चौकट ठरली होती, अपक्षांना यापूर्वीही बंडखोरी रोखण्याचे आवाहन केले होते त्यांनी त्याला दाद दिली नाही त्यामुळे यासंदर्भातील निर्णय पक्षश्रेष्ठ घेतील, असे ते म्हणाले .

सातारा जिल्ह्यामध्ये सातारा, कराड, पाचगणी, महाबळेश्वर, मलकापूर, वाई, रहिमतपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना चांगली यश मिळेल.  जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील. आठ नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्वत्र प्रचार यात्रा कोपरासभा जाहीर सभा गाठीभेटी याविषयी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले होते. वातावरण निर्मिती करून मतदारांपर्यंत पोहोचण्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी यश मिळवले आहे .त्यामुळे निश्चितच सर्व उमेदवारांना नगरपालिका निवडणुकीत चांगली यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


सुवर्णाताई पाटील यांच्या बंडखोरी विषयी बोलताना शिवेंद्रसिंह राजे म्हणाले पक्षाने जर सुवर्णाताई यांना राज्यस्तरावरची ताकद दिली होती मग त्यांनी पक्ष का सोडला ?त्यांना खुर्ची आणि सत्ता ही महत्त्वाची वाटत होती त्यांना यापुढे सुद्धा संधी मिळू शकली असती .माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील हे त्यांच्या प्रगती मधील सर्वात मोठा अडथळा आहे असा टोमणा शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला .ते म्हणाले उद्या पाटील जर नगरपालिकेत येऊन बसायला लागले तर सातारा पालिकेत पत्रकारांना सुद्धा टोल द्यावा लागेल अशा शब्दात त्यांनी पाटील यांच्यावर टीका केली .विरोधकांचे आव्हान सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला नाही उमेदवारांचे फार फार तर काही ठिकाणी मताधिक्य कमी होऊ शकते.  मनोमिलनाचे साताऱ्यात उमेदवार घवघवीत यश मिळवतील,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मी नाराज नाही, पण फॉर्म भरला नाही याची नाराजी आहे ; खासदार उदयनराजे भोसले यांची मतदानानंतर टोलेबाजी
पुढील बातमी
फलटण तालुक्यातील आसू येथे जातीय हल्ला; आरोपीला अटक नाही; पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षणाची मागणी

संबंधित बातम्या