सातारा : कंपनीची सुमारे 49 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 जुलै ते 9 ऑगस्ट 2022 दरम्यान तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा येथील ग्रीनफिल्ड अग्रिकॅम इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये प्रादेशिक विक्री व्यवस्थापक या पदावर असणाऱ्या संदीप रामप्रसाद खरात रा. निमखेडी शिवार, जळगाव यांनी कंपनीचा विश्वास संपादन करून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रतिभा ॲग्रो या नावाने 51 लाख 797 रुपये किंमतीचा कंपनीचा माल घेऊन त्यापैकी दोन लाख 17 हजार रुपये इतकी रक्कम कंपनीला देऊन उर्वरित रक्कम एक महिन्यानंतर देतो, असे सांगितले. मात्र अद्याप पर्यंत कंपनीच्या घेतलेल्या मालाची एकूण 48 लाख 90 हजार 797 रुपये इतकी रक्कम त्याने परत दिली नसल्याने त्याच्या विरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.