नवी दिल्ली : लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी गेले काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे लडाख येथे उपोषण सुरू होते. या उपोषणाचा आज पंधरावा दिवस होता. उपोषणाच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी बंद पाळला होता. दरम्यान एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी हिंसक होत, जाळपोळ करायला सुरुवात केली. तसेच भाजपचे कार्यालयही पेटवून दिले. हिंसाचारामध्ये अद्याप पर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करावा, आणि केंद्रशासित प्रदेश ऐवजी, राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशा मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. या उपोषणाला स्थानिक विद्यार्थ्यांचाही पाठिंबा होता. आज उपोषणाचा पंधरावा दिवस होता. मात्र असे असतानाच लडाख मधील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी ठीक ठिकाणी आंदोलन सुरू केली. या आंदोलनाने आज दिनांक (२४ सप्टेंबर) हिंसक वळून घेतलं. संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू झाली. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक ही केली. आंदोलकांनी लेह मधील भारतीय जनता पक्षाचे कार्यालयीन फोडून ते पेटवून दिले. या घटनेमुळे लेह मध्ये एकच खळबळ उडाली, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत, दोलकांवर लाठी हल्ला केला. पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये अद्याप पर्यंत चार जणांचा मृत्यू माहिती मिळत आहे. दरम्यान या हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले पंधरा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित केले आहे.