सातारा : महान संगीतकार ओ.पी. नय्यर यांची गाणी कर्णमधुर असून ते प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. असे प्रतिपादन संगीततज्ञ व गायक संजय दीक्षित यांनी केले.
दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित मुकुंद पांडे संकल्पना आणि दिग्दर्शित,"बाबूजी धीरे चलना" या रंगारंग गीत मैफिलीच्या उद्घाटन प्रसंगी दीक्षित बोलत होते. यावेळी डी.एन.वैद्य, अनिल वाळिंबे, शिरीष चिटणीस, मुकुंद पांडे, व शिकलगार उपस्थित होते.
संजय दीक्षित म्हणाले, "गायकाचे काम गाणे असते. बोलणे नसते त्यामुळे माझे खरे कौशल्य गाण्याचे आहे. शिरीष चिटणीस यांनी सांगितल्या प्रमाणे डिसेंबर पासून वैविध्यपूर्ण गाण्याचे कार्यक्रम आयोजित करणार असून दर महिन्याला एक असे बारा कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे. तसेच ते कराओके ट्रॅक वरील संगीताचे कार्यक्रम घेण्यामध्ये वाकबगार आहेत. मुकुंद पांडे उत्तम गायन करतात. मेलोडीयस संगीतकार ओ.पी. नय्यर हे त्या काळचे प्रसिद्ध संगीतकार तसेच युवा वर्गात लाडके व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अनेक अजरामर गाण्याचा आपण आस्वाद घ्यावा."
शिरीष चिटणीस म्हणाले, "येणाऱ्या कालावधीत कराओके प्रोग्रॅमच्या माध्यमातून मोबाईलमध्ये अडकून पडलेल्या पिढीला बाहेर काढता येईल. वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी ते उपस्तिथी राहतील व त्यातून कलेकडील त्यांचा ओढा वाढेल. चांगले वातावरण निर्मिती होईल. संगीत क्षेत्रामध्ये सातारचे योगदान खूप मोठे असून सातारच्या कलाकारांचे पुण्यामध्ये कार्यक्रम झाले पाहिजेत."
प्रशासकीय कारकीर्द गाजवणारे डी.एन.वैद्य म्हणाले, "गायक मुकुंद पांडे आपल्याला या गीत मैफिलीतून सन 1950 ते 60 या सुवर्ण युगात घेऊन जाणार आहेत. आम्ही जेव्हा कॉलेजला जात होतो. तेव्हा, ओ.पी. नय्यर यांची गाणी ऐकत होतो. तेव्हा थेटरमध्ये जाऊन फिल्म बघणे यास परवानगी नसे. तसेच खिशामध्ये पैसेही नसायचे. त्यामुळे आम्ही देवकुळे वॉच कंपनीमध्ये जाऊन आमचे आवडते गीत ऐकायचो. त्यांची "नया दौर" मधील गाणी खूप गाजली होती. त्यांच्या गाण्यांमध्ये कर्ण मधुरता आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये शिरीष चिटणीस यांनी कला सरगम संस्कृतिक केंद्र उभारणीसाठी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी कंपनीदार, सत्ताधार व व्यापारीवर्ग यांची आपल्याला मोलाची मदत होईल. तसेच त्यांनी संगीताची अकॅडमी सुरू करावी."
मुकुंद पांडे म्हणाले, ओ.पी. नय्यर यांची गाणी जशी कर्ण मधुर आहेत. तशीच ती सुंदर आहेत. परंतु गायला फार कठीण आहेत. त्यांच्या गाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुद्धा शिवधनुष्य पेल्यासारखे आहे. आम्ही सातारमधील विविध गायक गायिकांसोबत सदरचा हा कार्यक्रम करणार असून आपल्यासाठी ती पर्वणी ठरणार आहे. ओ.पी. नय्यर यांची गाणी म्हणताना त्या गाण्याचा रिदम पकडणे ही एक अवघड बाब असल्यामुळे त्यांचे संपूर्ण गायकीचे कार्यक्रम मुंबई, पुणे येथे होत असतात. तिथे प्रोफेशनल गायक आहेत. त्याचप्रमाणे सातार मधील प्रिया अघोर, मधु गिजरे, विजया चव्हाण या सुद्धा उत्कृष्ट गायिका आहेत. तसेच त्यांचा आवाज सुद्धा कर्णमधुर आहे.
या गीत मैफिलीमध्ये प्रेम गीत विरह गीत, सोलो गीत, ड्युटी गीत, कव्वाली, फर्माईश गीतांचा समावेश करण्यात आला होता. आशुतोष देशपांडे यांच्या " पुकारता चला हु मै" या गीताने सुरुवात झाली. यानंतर परितोष अघोर यांनी, "आपके हसीन रूक पे" प्रशांत कुलकर्णी, "दिल की आवाज भी सून" लक्ष्मीकांत अघोर " हमने लाख हसी देखे". विजया चव्हाण, "आखो से उतरी है दिल में" अरुण कुलकर्णी, "सवेरे का सुरज" यासारख्या गीतांना रसिक श्रोत्यांच्या पसंतीची पावती मिळाली. मुकुंद पांडे व प्रिया अघोर, "आप युही अगर हम से" मधु गिजरे "बाबूजी धीरे चलना" आशुतोष देशपांडे व रेश्मा वाळिंबे, " जाने कहा मेरा जिगर गया जी"
परितोष अघोर व प्रिया अघोर, "दिवाना हुआ बादल"मधु गिजरे व रेश्मा वाळिंबे,"कजरा मोहब्बत वाला" अरुण कुलकर्णी, " ये चांद सा रोशन चेहरा" लक्ष्मीकांत अघोर व प्रिया अघोर, "ऐ दिल है मुश्किल जीना यहा" मुकुंद पांडे व विजया चव्हाण,"सर पे टोपी लाल हात मे" लक्ष्मीकांत अघोर व प्रिया अघोर "इशारो इशारो मे" यासारख्या सदाबहार गीताने कार्यक्रम उंचीवर गेला. शिरिष चिटणीस यांचे फर्माईश गीत "मै प्यार का राही हुं" मुकुंद पांडे आणि विजया चव्हाण यांनी खुप जबरदस्त ठेक्यात म्हटले. अरुण कुलकर्णी व माधु गिजरे ,"ले के पहला पहला प्यार" प्रिया अघोर, "जाईये आप कहा जायेंगे" मुकुंद पांडे व विजया चव्हाण " मै प्यार का राही हु" मधु गिजरे, "हु अभी मै जवा"आशुतोष देशपांडे व प्रिया अघोर,"आखोही आखो मे इशारा हो गया" रेश्मा वाळिंबे " चैन से हमको कभी" प्रशांत कुलकर्णी " तू औरो की क्यू हो गई" प्रिया अघोर " जाता कहा है दिवानो" प्रशांत कुलकर्णी व विजया चव्हाण, "उडे जब जब जुल्फे तेरी" यासारख्या गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
शेवट मुकुंद पांडे व मधु गिजरे " सून सून जालीमा" या सदाबहार गीताने झाला. ॲड. स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर रेश्मा वाळिंबे यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या रंगारंग गीत मैफिलीला साहित्य, कला, संस्कृती नाट्य संगीत या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |