सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महादरे रस्त्यावरुन केसकर कॉलनी या रस्त्यावर पाठलाग करुन तसेच राहत्या घरी खांद्यावर हात टाकून गैरकृत्य केल्याप्रकरणी संदेश बळीराम पडवळ (पत्ता माहिती नाही) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दि. 5 जानेवारीला हा प्रकार घडला होता. पोलीस हवालदार चव्हाण तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सदरबझार येथील विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
November 05, 2025
नोकरीच्या अमिषाने फसवणूकप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याच्या पतीवर गुन्हा
November 05, 2025