सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास प्रेमवीर राजेंद्र पाटील मूळ रा. कुडनूर, ता. जत, जि. सांगली. सध्या रा. गोडोली, सातारा हा संशयितरित्या आपले स्वतःचे अस्तित्व, चेहरा लपवून अपराध करण्याच्या उद्देशाने श्री साई रेसिडेन्सी, गोडोली, सातारा येथे अंधारात बसलेला आढळून आला. अधिक तपास महिला पोलीस नाईक कदम करीत आहेत.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 06 February 2025