संगम नगर परिसरात सुमारे आठ लाखांची घरफोडी

by Team Satara Today | published on : 30 May 2025


सातारा : संगम नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान पंकज बाजीराव यादव रा. संगमनगर, सातारा यांच्या राहत्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक कदम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण
पुढील बातमी
जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णु शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

संबंधित बातम्या