अश्विनी कॉलनीतील विनापरवाना बांधकामावर कारवाईची मागणी; कामगार संघर्ष संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू

by Team Satara Today | published on : 23 February 2026

सातारा  : सातारा येथील अश्विनी कॉलनी, गोळीबार मैदान परिसरातील गट क्र. 63/3 मधील काही नागरिकांनी विनापरवाना व अधिक जागेत बांधकाम केल्याचा आरोप करत कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार पासून अर्धनग्न आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

याबाबत जिल्हाध्यक्ष आतिश कांबळे यांनी माहिती दिली. देशमुख, सूर्यवंशी, काळे, सावंत, शिंदे, तुपे व रणपिसे यांनी सातबारा उताऱ्यातील जागेपेक्षा जास्त बांधकाम केल्याचा दावा संघटनेने केला आहे. यापूर्वी निवेदने व 5 जानेवारी 2026 रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करूनही कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच 2024 मध्ये बांधकाम परवाना मिळालेल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अश्विनी कॉलनीतील विनापरवाना बांधकामावर कारवाईची मागणी; कामगार संघर्ष संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू
पुढील बातमी
अश्विनी कॉलनीतील विनापरवाना बांधकामावर कारवाईची मागणी; कामगार संघर्ष संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू

संबंधित बातम्या