सातारा : महिलेला विवाहाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवून गर्भवती केल्याप्रकरणी पंकज दोभाडा (रा.दहिगाव ता.माळशिरस जि.सोलापूर) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अत्याचाराची ही घटना नोव्हेबर 2023 ते एप्रिल 2025 या कालावधीत घडली आहे. शारीरीक संबंध ठेवल्यानंतर संशयिताने महिलेला विवाहास नकार दिला. तसेच मारहाण करत शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपाधिक्षक अतुल सबनीस करीत आहेत.