अटकाव प्रकरणी दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 June 2025


सातारा : शाळा उघडण्यास अटकाव केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास खेड विकास नगर खेड येथील शाळा उघडण्यासाठी भारती नागेश काळंगे आल्या असता त्यांना तेथीलच चंद्रकांत नामदेव जाधव आणि सीमा चंद्रकांत जाधव यांनी शाळेचे गेट उघडण्यास अटकाव केला. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा
पुढील बातमी
अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या