जांबचे सुपुत्र वेदांत शिंदेचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण; ‘मातीतली माणसं' वेब सीरिजचे चित्रीकरण सुरु

by Team Satara Today | published on : 19 October 2025


भुईंज : सातारा जिल्हय़ातील वाई तालुक्यातील ‘जांब' गावचे सुपुत्र वेदांत शिंदे यांनी निर्मिती क्षेत्रात नवे पाऊल टाकले आहे. त्यांच्या ‘कट्टा फिल्म्स' या यूटय़ूब चॅनेलवर येत्या 25 ऑक्टोबरपासून ‘मातीतली माणसं' ही अस्सल गावठी वेब सीरिज सुरू होत आहे. जांब गावचे नावही आता वेब सीरिजच्या नकाशावर आले आहे. गावाकडच्या हौशी कलाकारांना घेऊन वेदांत ही वेब सिरीज करत आहे.

जांब मध्ये नुकतेच किसनवीर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रमोददादा शिंदे यांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते या वेब सिरीज चे शूटिंग सुरू झाले. ‘मातीतली माणसं' या वेब सीरिजचे संपूर्ण चित्रण जांब गावच्याच परिसरात होणार आहे. गावातील मज्जा, धम्माल यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. गावातील माणसं, त्यांचा संघर्ष, भावभावना आणि चेहऱयांमागचे चेहरेही रसिकांना बघायला मिळतील. याचे लेखन व दिग्दर्शन वैजनाथ चौगुले यांनी केले आहे. सहाय्यक दिग्दर्शक स्वप्निल देसाई आहेत. संगीत सुशांत कांबळे यांचे आहे. तर कॅमेरामनची भूमिका आनंद काळे यांनी निभावत आहेत.

हृदयाला भिडणाऱया अनेक गोष्टींमागच्या गोष्टी या नव्या कोऱया वेब सीरिजमधून प्रेक्षकांसमोर येत आहेत. वेदांत शिंदे पुण्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना या माध्यमातून वेबसृष्टीत पदार्पण करीत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजप पदाधिकार्‍यावर कोयत्याने वार; रहिमतपूरनजीक जयपूर येथील शिवनेरी कारखाना परिसरात घटना
पुढील बातमी
मोटरसायकलच्या अपघातात जखमी झालेल्या बिचुकले येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या