सातारा : लोणंद रस्त्यावर शिवथर, ता. सातारा येथे रात्री आठ वाजता दुचाकी खड्ड्यामध्ये आदळून झालेल्या भीषण अपघातामुळे कैलास ज्ञानेश्वर फासे ((वय 30 रा. भिकवडी, ता. विटा) याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की वाटारवरून सातारच्या दिशेला जात असताना शिवथर गावामध्ये सातारा लोणंद रस्त्यावर दोन महाकाय खड्डे पडले आहेत. कैलास फासे हा दुचाकी क्रमांक (MH-10E-3341) वरून सातारच्या दिशेने जात असताना याच मोठ्या खड्ड्यांमध्ये दुचाकी आढळून रस्त्यावर पडला. समोरून येणारा कंटेनर (NL-01-N-0981) हा वाठारच्या दिशेने जात होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे कंटेनरचे चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेल्यामुळे दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला.