पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

by Team Satara Today | published on : 03 November 2025


सातारा  :  दि. 1 नोव्हेंबर 2025 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे तथा मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक व पदवीधर मतदार संघ यांच्यामार्फत दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी सातारा व २६२ सातारा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांत अधिकारी सातारा हे सहा. मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्यांचे देखरेखीखाली सातारा तालुक्यासाठी खालील ६ पदनिर्देशित अधिकारी नियुक्ती केली असून त्यांच्यामार्फत पदवीधर मतदार संघासाठी विहीत नमुन्यातील फॉर्म नं १८ व शिक्षक मतदार संघासाठी फॉर्म नं १९ भरून घेण्याची कार्यवाही अधिसुचनेतील कार्यक्रमाप्रमाणे दि. 6 नोव्हेंबर 2025 अखेर सुरू राहणार असून  दोन्ही मतदार संघासाठी साधारण रहीवास पुरावा, आवश्यक असून पदवीधर मतदार संघासाठी दि. 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी मान्यता प्राप्त विदयापीठाचे पदवी प्रमाणपत्र झालेले पदवीधर हे अर्ज करण्यास पात्र आहेत.  तर शिक्षक मतदार संघासाठी दि. 1 नोव्हेंबर 2025 पासून मागील ६ वर्षामधील ३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत असल्याबाबत संस्थाप्रमुखांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरी वरील सर्व पात्रता प्राप्त सर्व शिक्षक व पदवीधर यांनी सदर मुदतीत खालील पदनिर्देशित अधिकारी आपले अर्ज दाखल करून जास्तीत जास्त नोंदणी करण्याबाबत सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांत अधिकारी सातारा आशिष बारकूल व  पदनिर्देशित अधिकारी तथा तहसिलदार सातारा समीर यादव यांनी असे आवाहन केले आहे.


 पदनिर्देशित अधिकाऱ्याचे नाव व फॉर्म स्विकारण्याचे संबंधिताचे कार्यालय याचा तपशिल पुढीलप्रमाणे.

समीर यादव  तहसीलदार सातारा -तहसील कार्यालय सातारा, मुख्याधिकारी अभिजीत बापट- नगरपरिषद सातारा, नायब तहसिलदार सातारा (उ.वि कार्यालय)-दयानंद कोळेकर उपविभागीय कार्यालय सातारा, नायब तहसिलदार सातारा (महसुल) विजयकुमार धायगुडे- तहसिलदार कार्यालय सातारा, नि. नायब तहसिलदार सातारा युवराज गायकवाड - तहसिल कार्यालय सातारा, सहा गटविकास अधिकारी सातारा संतोष पवार - पंचायत समिती सातारा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुषमा अंधारे यांची महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका; 6 जणांची नावे रेकॉर्डवर् घ्यावी म्हणून ठिय्या आंदोलन; गंभीर आरोप
पुढील बातमी
किल्ले प्रतापगड येथील सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन देवू -खासदार उदयनराजे भोसले

संबंधित बातम्या