सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर.डी. पाटील यांची पुण्यतिथी साजरी !

by Team Satara Today | published on : 23 June 2025


सातारा  : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष स्व. रघुनाथराव दौलतराव पाटील उर्फ आर. डी. पाटील यांचा स्मृतिदिन  दिनांक १९/०६/२०२४  रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, सातारा  येथे संपन्न झाला. 

या प्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, सातारा जिल्हयाचे सर्वांगीण विकासासाठी, जिल्हयातील प्रत्येक तळागाळातील घटकांचा, सहकारी संस्थांचा, सहकार चळवळीचा तसेच औद्योगिक प्रगती होणेसाठी तसेच  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेत आर. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. या बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील, बाळासाहेब देसाई, आबासाहेब वीर इत्यादी नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभलेमुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. 

बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील म्हणाले, सन १९४७-४८ मध्ये कराड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सतत १५ वर्षे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष व संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ लि. पुणेचे अध्यक्ष, कोयना सह. दूध प्रकल्पांचे अध्यक्षपद अशी रघुनाथराव पाटील यांची यशस्वी कारकीर्द आहे. जिल्ह्यातील कल्याणकारी योजनांच्या उन्नतीसाठी आर .डी .पाटील यांनी निर्णायक सहाय्य केले. 

या प्रसंगी बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे,. सुरेश सावंत, लहुराज जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे उपव्यवस्थापक, विभागप्रमुख, अधिकारी व सेवक यांनीही स्व .रघुनाथराव दौलतराव पाटील यांचे प्रतिमेस फुले वाहून विनम्र अभिवादन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अशीही सातारी तर्‍हा; खड्डा झाला मोठा, रस्ता झाला छोटा
पुढील बातमी
बैठी जीवनशैली तुमच्या हृदयावर करते दुष्परिणाम

संबंधित बातम्या