कोरेगावात भरधाव कारची एसटी बसला धडक; मारुती कार चालकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 14 February 2026


सातारा : कोरेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता भरधाव वेगातील मारुती कारने समोरून येणाऱ्या एस.टी बसला दिलेल्या धडकेत कारचालक आयुष सचिन होनराव हा ठार झाला असून त्याचा मित्र प्रथमेश विशाल जामदार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस (क्र. एमएच १४ एमएच ४३८६) व मारुती ८०० कार (क्र. एमएच १४ सीडी २८९०) यांच्यात समोरासमोर धडक झाली. कार चालक आयुष सचिन होनराव (रा. कोरेगाव) हा वेगाने कार चालवत असल्याने अपघात झाला आहे. या अपघातात आयुष होनराव याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या शेजारी बसलेला प्रथमेश विशाल जामदार गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी दत्ताहरी खाकीराम लोने (वय ३९, रा. मुस्तापुर, ता. नायगाव, जि. नांदेड) या एस. टी. बस चालकाच्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू शिंदे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काशीळ स्टॅन्ड जिल्हा परिषद शाळेमध्ये मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा
पुढील बातमी
कासाणी हद्दीत बारा ब्रासचा परवाना घेऊन शेकडो ब्रास माती व मुरूमाचे उत्खनन

संबंधित बातम्या