सातारा : परळी येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 ते 19 डिसेंबर दरम्यान परळी, ता. सातारा येथील डॉ. मुराद आलम मुलाणी यांच्या क्लिनिकचे कुलूप लावून ठेवलेल्या बेडरूममधील कपाटातील लॉकर मधून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख दहा हजार रुपये रोख चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत.