सातारा : संशयास्पद मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चार भिंतीच्या पायथ्याला जय राहुल ठोंबरे सध्या रा. मोळाचा ओढा, सातारा हा विना नंबर प्लेटची मोपेड मोटरसायकल घेऊन फिरताना आढळून आला. या गाडीबाबत चौकशी केली असता गाडीच्या मालकी हक्काबाबत त्याने अद्याप पर्यंत कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.
संशयास्पद मालमत्ता बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 16 January 2025