सातारा : सातारा पोलिसांनी सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे मारत धडक कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी वाढे फाटा येथील साई हॉटेल च्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशास प्रमोद पांडुरंग कांबळे रा. खेड नांदगिरी, ता. कोरेगाव हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1110 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत, सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरातून सचिन साहेबराव निकम रा. सोमवार पेठ, सातारा यांच्याकडून 1120 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
तिसऱ्या घटनेत, शेंद्रे ता. सातारा येथून तेथीलच संतोष कृष्णा जाधव आणि समीर सलीम कच्छी रा. मोळाचा ओढा सातारा यांच्याकडून 1070 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
चौथ्या घटनेत, शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीतील रामचंद्र मानसिंग पोतेकर आणि शाहरुख काझी रा. कोरेगाव, ता. कोरेगाव यांच्याकडून 2050 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
पाचव्या घटनेत, नागेवाडी, ता. सातारा येथून तेथीलच निळकंठ शिवाजी सावंत यांच्याकडून 660 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
सहाव्या घटनेत, तासगाव, ता. सातारा येथून तेथीलच चैतन्य भीमराव सावंत यांच्याकडून 930 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
सातव्या घटनेत, सातारा शहरातील राजधानी टॉवरच्या आडोशास जुगार घेणाऱ्या महेश देविदास इनामदार रा. गडकर आळी, सातारा यांच्याकडून 1050 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
आठव्या घटनेत, सातारा शहरातील नगर वाचनालय समोरुन अली अब्बास चांद शेख रा. शनिवार पेठ, सातारा यांच्याकडून 790 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.