नगर विकास आघाडीची आज साताऱ्यात बैठक; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जाणून घेणार कार्यकर्त्यांची मनोगते

by Team Satara Today | published on : 02 November 2025


सातारा  : सातारा पालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले असून राज्य निवडणूक आयोगाची सुद्धा येत्या बुधवारी पत्रकार परिषद होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी सकाळी 11 वाजता येतील लेक व्हयू हॉटेलमध्ये होणार आहे. 

सातारा जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या 233 जागांसाठी निवडणूक होणार असून त्याकरिता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता जाहीर होऊ शकते असा अंदाज आहे.संपूर्ण जिल्ह्याचे सातारा नगरपालिकेच्या राजकीय समीकरणाकडे लक्ष लागून राहिले आहे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनोमिलन जाहीर होणार की मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव समोर येणार या दोन्ही विषयांची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर नगर विकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक येथील लेक व्यू हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता होणार आहे या बैठकीला स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत नगर विकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सर्व सदस्यांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे .2019 च्या निवडणुकीमध्ये मनोमिलन विस्कटल्याने समोरासमोर लढत होऊन आरपारची लढाई पाहायला मिळाली होती. मात्र यंदाच्या सातारा पालिकेच्या निवडणुकीत मनोमिलनाचे वारे पुन्हा वाहत आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात भाजपचा नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त भाजपचे नगरसेवक निवडून यावेत अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी नगर विकास आघाडीची होणारी बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सातारा विकास आघाडीच्या जलमंदिर येथे बैठकांचे सत्र गतिमान झाले आहे त्या पार्श्वभूमीवर नगर विकास आघाडीने सुद्धा बैठका आरंभले असून लवकरच राजकीय समीकरणे समोर येतील असा अंदाज आहे. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे हे कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सर्वांच्या सहकार्याने प्रतापगड कारखाना सक्षम होईल - ना. शिवेंद्रसिंहराजे; कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

संबंधित बातम्या