सातारा : शहर परिसरातून एक पुरुष आणि एक अठरा वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हरभजनसिंग ईश्वरसिंग राठोड (वय ३९ रा. गुरुवारबाग परज) हे राहत्या घरातून फॅब्रिकेशनच्या कामानिमित्त अहिल्यानगर येथे निघून गेले आहेत ते अद्याप पर्यंत परत आले नसल्याने त्यांच्या पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दाखल केली आहे.
तर सातारा तालुक्यातील लिंब येथे राहणारी अठरा वर्ष वयाची युवती कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली आहे. ती अद्याप पर्यंत माघारी न आल्याने मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली आहे.अधिक तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.