सातारा पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करण्यासाठी शिवसेनेचा साताऱ्यात मूकमोर्चा; जिल्हा प्रशासनाला निवेदन

by Team Satara Today | published on : 24 March 2026


सातारा  : सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला व समाजकारणाला वैचारिक परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान जे दबाव नाट्य, अटक सत्र आणि राज्याच्या मंत्री महोदयांना धक्काबुक्कीचे प्रकार झाला तो निंदनीय आहे. यात सत्ता स्थापन करण्यास मदत करणाऱ्या सातारा  पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थ पोवई नाका असा शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी मूक मोर्चा काढला.

यावेळी सातारा जिल्हातील कविता ताई ओबळे (जिल्हा परिषद सदस्य), सुलोचना चंद्रकांत पवार, उप जिल्हाअध्यक्ष.- सातारा, (शिवसेना सातारा), वर्षाताई अरडे (वाई विधानसभा सन्मयक), विमलताई सुपणेकर (कराड उत्तर विधानसभा उप जिल्हा प्रमुख. हिंगनोळे) संध्याताई दाभाडे (कराड दक्षिण तालुकाप्रमुख. वाहगाव ), प्रियांकाताई वाघमारे ( तालुका प्रमुख कराड उत्तर. उंब्रज), प्रियांकाताई नलावडे, (माण, खटाव, तालुका प्रमुख), मेघाताई चोरगे (महाबळेश्वर तालुका प्रमुख), मोनिकाताई पवार(कराड शहर प्रमुख), विद्याताई घाडगे(मलकापूर शहर प्रमुख), नंदिनी ताई गायकवाड,(तालुका प्रमुख फलटण.), सुनीता फाळके ,(महाबळेश्वर शहर प्रमुख ), सुजाता गायकवाड ( वाई तालुका प्रमुख ), अर्चनाताई जाधव,(महाबळेश्वर शहर प्रमुख ), विद्याताई वायदंडे,(पाटण शहर प्रमुख ), मंजिरी सावंत (सातारा शहरप्रमुख), मिनाक्षी मोरे शिवसेना वैध्यकीय महिला समन्वयक, कांचन गौरी शिंदे,सविता राठोड, रोजीया शेख,सुजाता राठोड,शांताबाई ओंबळे,नीता ओंबळे,कविता आंबळे(जिल्हा परिषद सधश्या ),हौसाबाई सुतार,उषा उंबरकर,पार्वती ओंबळे,आनंदी जुनघरे,वैष्णवी धनवडे,वनिता ओंबळे आणि इतर जिल्हातील शिवसैनिक, महिला पदाधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा प्रशासनाला सादर निवेदनात नमूद आहे की, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी निवडणूक पूर्व युती जाहीर करून बहुमतासाठी आवश्यक ते 37 संख्या बळ जुळवले होते. असे असताना विरोधकांनी बळाचा वापर करून प्रचंड दांडगाई केली. त्यादिवशी पोलिसांची भूमिका ही सत्ताधाऱ्यांना धार्जिणी किंबहुना घरगड्यासारखी होती. यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. खा. नितीन पाटील व ना. मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला असून जिल्ह्याच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासला गेला आहे. जि. प. मधील गोंधळ नाट्याची न्यायालयीन चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी. सीसीटीव्ही फुटेज सर्वांसाठी खुले करून नक्की त्या दिवशी काय घडले हे जनतेसमोर आणावे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड रद्द करून नव्याने फेर निवड घेण्यात यावी. संबंधित प्रकरणातील शासकीय स्तरावरील दोषी अधिकाऱ्यांच्या तत्काळ बडतर्फ करून त्यांच्या जागेवर कर्तव्यनिष्ठ अधिकारी नेमावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कचरा डेपो प्रश्नी सोनगाव ग्रामस्थांचे पुन्हा पालिकेला निवेदन; आगीमुळे नागरिक त्रस्त; तात्काळ उपाययोजनांची मागणी
पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांचा झेंडा ; नवोदय परीक्षेत साताऱ्याची राज्यात दमदार कामगिरी

संबंधित बातम्या