खंडणी प्रकरणी चार अज्ञातांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 June 2025


सातारा : ट्रक चालकास खंडणी मागितल्या प्रकरणी चार अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास किशोर बापू ठोंबरे राहणार नाथाची वाडी तालुका दौंड जिल्हा पुणे हे त्यांच्या ताब्यातील ट्रक क्र एमएच 12 युएम 7695 खिंडवाडी सातारा ते हॉटेल मराठा पॅलेस रस्त्याने घेऊन जात असताना मोटरसायकल क्र. एमएच 11 डीटी 3331 वरील दोन अज्ञात व चार चाकी कार क्र. एमएच 45 एक्यू 9915 वरील दोन अज्ञातांनी ट्रकला गाड्या आडव्या मारून ठोंबरे यांच्याकडे 15 हजार रुपयांची खंडणी मागितली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
विवाहितेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या