सातारा : सातारा शहर परिसरातील उपनगरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयिताने मुलीशी गैरवर्तन केल्यानंतर तिने आरडाओरडा करत स्वतःची सुटका करून घेतली. मात्र यावेळी संशयिताने, “तुझे फोटो इतर मुलांसोबत जोडून इंस्टाग्रामवर टाकेन,” अशी धमकी देत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत इंस्टाग्रामवर फोटो टाकण्याची धमकी; पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला
by Team Satara Today | published on : 14 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा