सातारा : सातारा तहसीलदार कार्यालय परिसरात ७२ वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि १८ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
विद्या विश्वास सकुंडे या वृद्धा पोवई नाका ते बस स्टॅन्ड भाजी मंडई बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याने चालत जात असताना समोरून आलेल्या दुचाकी चालकाने त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले आहे. साताऱ्यात सलग दोन दिवस मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहे. याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करत आहे.