सातारा : कोडोली येथे यात्रेनिमित्त बेकायदेशीर रावण साम्राज्य या नावाने बॅनर लावल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिकेत राजेंद्र जाधव (वय 26, रा. कोडोली), ओंकार जयवंत गवळी (वय 20, रा. कोडोली), ओंकार अशोक जाधव (वय 29, रा. कोडोली), शिवानंद उमेश गुरव (वय 20, रा. कोडोली), आदित्य सागर जाधव (वय 24, रा.कोंडवे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई दि. 2 एप्रिल रोजी करण्यात आली आहे. पोलीस हवालदार जयवंत गोसावी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयितांनी बॅनरवर ’नाम तो सुनाही होगा रावण साम्राज्य’, असा मजकूर लिहला होता. संबंधित बॅनरची परवानगी नसल्याचे समोर आल्याने पोलिसांनी संबंधित पाचजणांवर गुन्हा दाखल केला.
बेकायदेशीर बॅनर लावल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 03 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
बॉम्बे रेस्टॉरंट चौकात झोपडपट्टीच्या आडोशाला जुगार अड्ड्यावर धाड
December 21, 2025
बनावट मृत्युपत्र केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा
December 21, 2025
मालगाव येथील डीपीमधील तांब्याच्या 24 हजार रुपये किमतीच्या तारेची चोरी
December 20, 2025
डॉ. शालिनीताई पाटील : लढवय्या, करारी नेत्या
December 20, 2025
मोती चौक येथे भरधाव कार हॉटेलवर आदळून अपघात; एक जण जखमी
December 19, 2025
नगरपालिका निवडणूक मतमोजणी दिवशी साताऱ्यात वाहतूकीत बदल
December 19, 2025
स्वामी प्रसाद बंगलोच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी
December 19, 2025
खंडोबा मंदिर परिसरातून होंडा शाईन दुचाकीची चोरी
December 19, 2025
नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील अपघातप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल
December 19, 2025