सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती

ना. शिवेंद्रसिंहराजे; ० ते १८ वयोगटातील ९६ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

by Team Satara Today | published on : 17 May 2025


सातारा : आजचा बालक हा उद्याचा भारतीय नागरिक आहे. पुढे आपल्या देशाचे भविष्य या बालकांच्याच हाती असणार आहे. त्यामुळे उद्याचे सक्षम भारतीय नागरिक घडवण्यासाठी प्रत्येक बालकाच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे. ० ते १८ वयोगटातील बालकांचे असाध्य आजार बरे करण्यासाठी घेण्यात आलेले मोफत शस्त्रक्रिया शिबीर कौतुकास्पद आहे. सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती असून या संपत्तीचे रक्षण करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा, सायन हॉस्पिटल, मुंबई आणि सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ० ते १८ वयोगटातील विविध प्रकारच्या असाध्य आजाराने ग्रस्त बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी डॉ. संजय ओक, डॉ. पारस कोठारी, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कदम, डॉ. आमीर खान, डॉ. आदिती दळवी, डॉ. आयुद्रय पैस, डॉ. सुकन्या विंचूरकर, डॉ. क्षितिजा पोखरकर, रुचिता शहा, कुमुद खाडपे, आसिया पट्टणकुडे आदी उपस्थित होते. 

या शिबिरात विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ९६ बालकांवर आवश्यक शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या महेश यादव, राजू महाडिक, विलास कासार, महेंद्र गार्डे, विजय देशमुख, दीपक भोसले, डी. पी. शेख, प्रकाश घाडगे, चंद्रकांत बेबले, राहुल धनावडे, बबलू सोलंकी आदींनी परिश्रम घेतले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चीन-हाँगकाँग आणि सिंगापूर-थायलंड पाठोपाठ भयानक विषाणूचा भारताला देखील धोका?
पुढील बातमी
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे

संबंधित बातम्या