शहरात तीन ठिकाणी चोरीच्या घटना

by Team Satara Today | published on : 26 April 2025


सातारा : सातारा शहरात तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोडोलीतील मराठी शाळेजवळील मस्केवाडा येथे अज्ञाताने 1 लाख 87 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरुन नेली. ही घटना दि. 16 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान घडली. या प्रकरणी रत्नाबाई नामदेव डांगरे (वय 76, गोडोली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत.

दुसर्‍या घटनेत, पिरवाडीतील विश्व विनायक रेसिडन्सीमधील घरात रोख रक्कम व सोने असे 20 हजार रुपयांची अज्ञाताने चोरी केली. दि. 24 रोजी हा प्रकार घडला. प्रशांतकुमार दत्तात्रेय पडवळ (वय 47, रा. पिरवाडी) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार पोतेकर तपास करत आहेत.

तिसर्‍या घटनेत, सदरबझारमधील कणसे हॉस्पिटलसमोरील राही हॉटेल बंद असताना अज्ञाताने 70 हजार रुपयांच्या साहित्याची दि. 24 रोजी चोरी केली. फिलिप जॉन भांबळ (वय 49, रा. सदरबझार रोड, सेंट थॉमस चर्च, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार काटकर तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पहलगाम हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध
पुढील बातमी
सत्यमनगर येथून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या