सातारा : येथील भूविकास चौक येथे सुरु असलेल्या कंग्राळकर यांच्या लॅन्डमार्क टॉवरमध्ये काम करणार्या मजुराचा मृत्यू झाला. अनिल अल्लू मौर्य (वय २९, सध्या रा. दिव्यनगरी, सातारा मूळ रा. बलरामपूर, उत्तरप्रदेश) असे त्या मजुराचे नाव आहे. ही घटना दि. २८ मार्च रोजी घडली.
अनिल मौर्य याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक पडल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे