जिल्ह्यातील चौदा रस्त्यांसाठी 208 कोटीचा निधी

खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती

by Team Satara Today | published on : 04 April 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील चौदा रस्त्यांच्या बळकटीकरणासह सुशोभीकरणाच्या कामासाठी केंद्राकडून मध्यवर्ती मार्ग निधी या फंडातून 208 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामात मोठे सहकार्य केल्याने त्यांचे मनापासून आभार, अशी प्रतिक्रिया खा. उदयनराजे यांनी दिली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी या कामाच्या संदर्भामध्ये पत्रकात सविस्तर नमूद केले आहे. सातारा मोहोळ राज्य महामार्ग क्रमांक 141 मध्ये पोवई नाका नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक रस्ता रुंदीकरण 50 कोटी,जावळी तालुक्यातील आंबेघर फाटा पुनवडी केळंबे बोंडारवाडी रोड सहा किलोमीटर पैकी आंबेघर फाटा ते पुनवडी 3.75 मीटर रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा दहा कोटी,जावली तालुक्यातील महाबळेश्वर ते विटा राज्य मार्गावरील उभारणी व पोहोच रस्ता करणे आठ कोटी, जावली तालुक्यातील वहिटे केडंबे रोड पूल उभारणी जोड रस्ता सहा कोटी, जावली तालुक्यातील राज्य महामार्ग क्रमांक 140 ते पुनावडी रोड संरक्षक भिंत रस्ता सुधारणा पाच कोटी, पाचगणी ते कुडाळ आखाडे ते कुडाळ रस्ता सुधारणा रुंदीकरण दहा कोटी, जावळी तालुक्यातील कुडाळ नदीवरील वाई पाचवड येथे पुलाचे रुंदीकरण करणे अकरा कोटी, कोरेगाव तालुक्यातील खंडाळा पळशी कोरेगाव रहिमतपूर मसूर पलूस या रस्त्याचे रुंदीकरण 13 कोटी, माण तालुक्यातील फलटण शिंगणापूर म्हसवड शनि शिंगणापूर ते म्हसवड रस्त्याचे रुंदीकरण व दर्जोन्नती सहा कोटी, खटाव तालुक्यातील पुसेगाव वडूज कातरखटाव रोड स्टेट हायवे अखेर वडूज कातरखटावर रस्त्यावर लहान पुलांची कामे करणे 9 कोटी, खटाव तालुक्यातील खटाव धरपोडी जाखणगाव धनगर वस्ती ते अंबवडे व्हाया जाखनगाव या रस्त्याचे रुंदीकरण 15 कोटी, कराड तालुक्यातील कराड जवळील गुहागर विजापूर राज्य महामार्ग कोयना पुलाची चार लेन पुलाची नवीन उभारणी करणे पन्नास कोटी, वाई तालुक्यातील भुईंज शिवथर पाडळी जळगाव रोड येथे किकली फाटा ते राऊतवाडी या रस्त्याची सुधारणा पाच कोटी व वाई तालुक्यातील वाई जांभळी वाशिवली वासोळे अकोशी वहीगाव बलकवडी फाटा उळंब धनगरवाडा कात्रट वस्ती या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा दहा कोटी अशा विविध रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या विविध रस्त्यांच्या कामांना गती देऊन तेथील दळणवळण वृद्धिंगत करणे आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे उदयनराजे यांनी नमूद केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारच्या आयटी पार्कचा उदय सामंत यांच्याकडून पुनरुच्चार
पुढील बातमी
जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई

संबंधित बातम्या