सातारा : जनरेटर भाडे करारावर दिला असताना, भाडे करार संपल्यानंतर तो परत न करता उलट जनरेटर परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दत्तात्रय बाळकृष्ण फडतरे (वय 42, रा. जैतापूर ता. सातारा) यांनी अनिकेत आनंदा यादव (वय 27, रा. शिवाजीनगर, कराड) व अनिल नागेश यादव (रा.शेडगेवाडी) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 23 मार्च 2023 रोजी घडली आहे. दत्तात्रय फडतरे यांनी अनिकेत यादव यांना भाडे तत्कावर जनरेटर दिला होता. मात्र मुदत संपल्यानंतर तो परत न करता अनिकेत यादव याने अनिल यादव याला जनरेटर विकला. तसेच विकत घेणार्याने कागदपत्रांची पडताळणी न केल्याने त्याच्या विरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.