स्वमग्न मुलांच्या पालकांसाठी साताऱ्यात मोफत कार्यशाळा; आनंदवन शाळेत 5 एप्रिल रोजी आयोजन

by Team Satara Today | published on : 01 April 2026


सातारा : स्वमग्न मुलांच्या पालकांसाठी दि. ५  एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आनंदवन विशेष मुलांची शाळा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र नवीन एमआयडीसी सातारा येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक स्वमग्न दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पसचे चेअरमन डॉ. जवाहरलाल शाह यांनी दिली आहे.

या कार्यशाळेमध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजश्री देशपांडे स्वमग्न मुलांना उपचार देणारे विशेष तज्ज्ञ चित्रा शिंदे व होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहरलाल शहा इत्यादी मान्यवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत .ही कार्यशाळा सकाळी पावणेदहा ते सव्वा बारा यादरम्यान होणार असून ही कार्यशाळा संपूर्ण मोफत आहे. कार्यशाळेला येणाऱ्या पालकांसाठी सातारा बसस्थानक येथून शाळेपर्यंत विशेष बसची सोय करण्यात आली आहे.स्वमग्न मुलांच्या पालकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चार वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्‍मठेपेची शिक्षा; सातारा तालुका पोलिसांची अभिनंदनीय कामगिरी
पुढील बातमी
प्रतापसिंहनगर येथे चालत जाणाऱ्यास दुचाकीची धडक; दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी