सातारा : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी तालुका पोलिसांत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद पीडितेच्या आईने दिली आहे. रोहित संजय कोरे (रा. ब्रम्हपुरी,माळी वस्ती,रहिमतपूर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान घडली आहे.संशयित आरोपी रोहित कोरे याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्या सोबत तिची इच्छा नसताना तिला जबरदस्तीने मिठी मारली तसेच एका लॉजवर दोन वेळा अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपास करण्याच्या सूचना संबंधित पोलिसांना दिल्या आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक काटकर करत आहेत.