सातारा गॅझेटच्या पडताळणीसाठी वेळ द्यावा लागेल : ना. देसाई

by Team Satara Today | published on : 15 September 2025


सातारा : सातारा गॅझेटमधील कागदपत्रे जुनी आणि जीर्ण असल्यामुळे यासाठी अधिकृत पडताळणीसाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्टीकरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केले.

ना. देसाई म्हणाले, मंत्रिमंडळ उपसमितीनुसार त्यावेळी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा विचार केला. यानंतर सातारा आणि औंध गॅझेट लागू करण्याचा विचार समोर आला. याविषयी आंदोलनकर्त्यांकडून थोडा वेळ घेतला आहे. या गॅझेटविषयी उपसमितीचे सदस्य मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा गॅझेट विषयी कागदपत्र ही जुनी जीर्ण आहेत, असे स्पष्ट केले होते. तरी ही सर्व कागदपत्र राजघराण्याकडे असतील तर ती लवकर उपलब्ध होतील.

मात्र सरकारची भूमिका ही सातारा गॅझेटमधील सर्व कागदपत्र अधिकृत असावीत आणि हे सर्व ट्रान्सलेट करून त्याचं अधिकृत माहिती समजावून घेणे हे आहे. सातारा गॅजेटबाबत मंगळवारी होणार्‍या उपसमितीच्या बैठकीत हा सर्व विषय समोर येईल, त्यावेळेस या गॅझेट विषयी समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील अधिकृत माहिती सांगतील, असेही ना. शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील शासकीय रग्णालयात एका वेळी चार बाळांना जन्म
पुढील बातमी
सकाळी झोपेतून लवकर उठण्याचा सगळ्यात मोठा फायदा

संबंधित बातम्या