सातारा : खेड, ता.सातारा येथे घरामध्ये लाउडस्पीकरवर प्रार्थना लावून जोरजोरात अन्य धर्माबद्दल अपमानास्पद बोलून भावना दुखावल्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजस्विनी आवळे, नंदा भिसे, दिपाली भिसे, गुरुनाथ शिंदे, संदीप ओव्हाळ, प्रिती भिसे (सर्व रा. सातारा), विनीत सोनावणे, मयुर सोनावणे (दोघे रा.पुणे) यांच्या विरुध्द प्रदीप सुरेश धनवडे (वय 38, रा. न्यू विकासनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
ही घटना दि. 4 डिसेंबर रोजी घडली आहे. धार्मिक भावना दुखावल्या जात असताना तक्रारदार यांनी संबंधितांना सुरु असलेला कार्यक्रम बंद करण्यास सांगितले. मात्र संबंधितांनी शिवीगाळ, दमदाटी केली. यामुळे तक्रारदार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेनंतर परिसरासह पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी गर्दी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.