खटाव - खटाव तालुक्यातील अंबवडे-गोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या येरळा नदीच्या पुलावरून एक जण वाहून गेली असल्याची घटना काल घडली होती. सध्या तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून नदी पात्रात मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह एनडीआरएफ रेस्क्यू टीम घटनास्थळी शोध घेत आहे. पोलिस प्रशासन ड्रोनच्या माध्यमातून शोध घेत आहेत. काल अंबवडे गोरेगाव रस्त्यावरील असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते. यावेळी एक जण त्या पुलावरून जाण्याचे धाडस करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पुरात वाहून गेला होता.
सुरेश रघुनाथ गायकवाड हे अंबवडे येथील रहिवाशी असल्याचे समोर आले होते. दरम्यान आज घटनास्थळी रेसिक्यु टीम , पोलीस, तलाठी, पोलिस पाटील, व शासकीय यंत्रणा पोहचली असून शोधकार्य सुरू आहे.