पालिकेच्या नो हॉकर्स झोनला विक्रेत्यांचा विरोध

रिपाई चा आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 13 May 2025


सातारा : सातारा पालिकेने मोती चौक ते 501 पाटी शनिवार चौक या दरम्यान केलेल्या नो हॉकर्स झोनला विक्रेत्यांनी विरोध केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने विक्रेत्यांच्या हक्कासाठी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रिपाईच्या पदाधिकार्‍यांनी विक्रेत्यांसह आज मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेतली आणि या बैठकीत हॉकर्स झोनला विक्रेत्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.विक्रेत्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या विक्रेत्यांवर बँका, पतसंस्थांची कर्जे आहेत. या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. नो हॉकर्स झोनमुळे सर्वांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे आम्हाला पालिकेचा निर्णय मान्य नाही, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. ज्या विक्रेत्यांचा बायोमेट्रिक सर्वे झालेला आहे, अशा विक्रेत्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन मुख्याधिकार्‍यांनी दिले. मात्र हॉकर्स झोन संदर्भात चर्चा सफल होऊ शकली नाही. या संदर्भात रिपाईच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले यांची निवड
पुढील बातमी
परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास फणसे यांचे निधन

संबंधित बातम्या