सातारा : सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची विनाकारण बदनामी केल्याच्या निषेधार्थ स्वराज्य कामगार संघटनेने संबंधितांचा पालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करून संबंधित प्रवृत्तींचा निषेध केला. कामगारांनी या प्रकरणाचा निषेध करून संबंधित गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलिस अधीक्षक समीर शेख यांना सादर करण्यात आले आहे. सातारा पालिकेकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे विकसण्याचे काम सुरू आहे. ते काम सर्व प्रक्रियेनुसार सुरू आहे. या कामाचा ठेका देण्यात आला आहे. त्यावरून दोन गट तयार झालेले आहेत.
त्यापैकी एका गटाने मुख्याधिकारी बापट यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्याधिकाऱ्यांवर वेडेवाकडे आरोप करणाऱ्या लबाडांचा आम्ही निषेध करत आहोत. तसेच त्यांच्यावर झालेल्या आरोपाचे आम्ही खंडन करत असल्याचे स्वराज्य कामगार संघटनेने पत्रकाद्वारे कळवले आहे. या संबंधित गावगुंडांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.