खनौरी : पिकांसाठी कायदेशीर बंधनकारक किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मागणीसाठी पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकर्यांचे आंदोलन सुरूच आहे. आज (दि.१६) पंजाबमधील शेतकऱ्यांनी तीन तासांचे 'रेल रोको' आंदोलन सुरू केले.
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचा मोगा, फरीदकोट आणि मोहालीसह प्रमुख स्थानांवर परिणाम झाला. शंभू आणि खनौरी सीमेवरही आंदोलने सुरूच आहेत. शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल उपोषण करत आहेत. एमएसपीवर कायदेशीर हमी, कर्जमाफी, शेतकऱ्यांना पेन्शन, पोलिस खटले मागे घेणे आणि मागील आंदोलनातील पीडितांना भरपाई या मागण्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या 'रेल रोको' आंदोलनामुळे, पंजाबमधील विविध स्थानकांवर अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत, काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
