सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी दिली आहे.साताऱ्यात अडीच वर्षानंतर कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर एक महिला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोनाग्रस्त झाल्यानंतर अंतिम स्तरावर या महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर येथील रुग्णालयातील कोरोना वार्ड मध्ये उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. मात्र उपचार घेत असताना आज त्यांचा मृत्यू झाला. या महिला रहिमतपूर येथील होत्या.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा