सातारा : मी शिक्षक आमदार असताना उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना समोरासमोरच शाळा टिकविण्याबाबत चर्चा विनिमय केला होता. असे प्रतिपादन माजी शिक्षक आ.भगवानराव साळुंखे यांनी केले.
मुख्याध्यापक संजय गुरव व काकासाहेब गायकवाड या शिक्षकांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम अंधारी माध्यमिक विद्यालयाच्यावतीने येथील अजिंक्य माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या इमारतीवरील हॉलमध्ये (जिल्हा मुख्याध्यापक संघ ) येथे आयोजित करण्यात आला होता. तेव्हा अध्यक्षस्थानावरून भगवानराव साळुंखे मार्गदर्शन करीत होते. यावेळी माजी कृषी सभापती भीमराव (काका) पाटील,सौ.सुनीता यशवंत पाटणे,रवींद्र शेलार,माजी सभापती अमित कदम आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.
भगवाराव साळुंखे म्हणाले, मातृभाषा जिवंत ठेवली पाहिजे. नातू अर्थात, येणारी नवी पिढी यांना गुन्हेगारापासून अलिप्त ठेवण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. भान ठेवुन नियोजन करून बेभानपणे काम केले पाहिजे." शासनांनी अनुदान बंद करून गरीब शिक्षकांच्या मागे लागले आहेत. कलेक्टर यांना कार्यालय व ग्रामसेवक यांना गाव सांभाळायला सांगा? असा रोखठोक सवालही साळुंखे यांनी करीत या पुढे संघटनेमार्फत लढा उभारण्यास सज्ज राहण्याचे संकेत त्यांनी दिले.
माजी सभापती अमित कदम म्हणाले,"आम्ही राजकीय पक्षाची झुल बाजुला ठेवून शिक्षकांच्या न्यायासाठी पुढे येऊ. खरोखर, अंधारी सारख्या दुर्गम भागात शिक्षकांना काम करणे अवघड आहे. तेव्हा सोयीसुविधा पुरवणे गरजेचे आहे." मुख्याध्यापक गुरव व गायकवाड सर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव साळुंखे यांच्यासह अमित कदम,महालक्ष्मी ग्रुपच्या अध्यक्षा सौ.सुनीता पाटणे, भीमराव काका पाटील, सरपंच सुरेख शेलार, भरत जगताप, बाळासाहेब चोपडे, संतोष कदम, अंधारी प्राथमिक शाळेच्या शिक्षकासह केंद्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मनोगत संपन्न झाली. यावेळी श्री. व सौ .गुरव-गायकवाड या दांपत्यांचा सत्कार अनेकांनी केला. त्यामध्ये अनिल वीर व ऍड.विलास वहागावकर यांनीही दाम्पत्याचा सत्कार केला. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. यादवसर यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला.