सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंटचे दीपक मुकुट आणि थ्री डायमेंशन मोशन पिक्चर्सचे संजय दत्त निर्माते, सिद्धांत सचदेव लेखन व दिग्दर्शन. ‘द भूतनी’ १८ जुलै रोजी रात्री ८ वाजता ZEE5 आणि Zee Cinema वर स्ट्रीम होणार आहे!
जुलै २०२५: एक भूत, एक लव्ह स्टोरी, एक बाबा आणि खूप सारा गोंधळ! The Bhootnii संजय दत्त निर्माते, सिद्धांत सचदेव लेखन व दिग्दर्शन. ‘द भूतनी’ १८ जुलै रोजी रात्री ८ वाजता ZEE5 आणि Zee Cinema वर स्ट्रीम होणार आहे!
थिएटरमध्ये हसवत-घाबरवत धमाल उडवलेल्या या सिनेमात संजय दत्त साकारणार आहेत एक हटके भूतबस्टर, ज्याच्या स्वतःच्या अंगातच काही भुताटकी गुपितं आहेत! मौनी रॉय आहे मोहब्बत – एक सुंदर पण जीवघेणी आत्मा, आणि सनी सिंग आणि पलक तिवारी आहेत कॉलेज स्टुडंट्स – जे फसलेत एका भुताटकी बवालात! आणि हो, आसिफ खान आणि BeYouNick ही जबरदस्त साथ देताना दिसणार आहेत.
कथा आहे दिल्लीच्या सेंट व्हिन्सेंट्स कॉलेज मधली – जिथे व्हॅलेंटाईन डे आला की, एक भूत आणि झाड मिळून राडा घालतात! आणि या सगळ्यात अडकतो शांतनू (सनी सिंग) – ज्याच्या ब्रेकअपने आधीच वाट लागलीय, आणि आता त्याने चुकून जागवलंय मोहब्बत नावाची एक भावुक पण धोकादायक आत्मा!
जसं-जसं मोहब्बत शक्तिशाली होते, कॅम्पसवर येतात अजीब भास, छायाचित्रं आणि मृत्यूंची मालिका. आणि मग एंट्री होते बाबांची (संजय दत्त) – हातात झोळी, डोक्यात तंत्र, आणि एक रहस्यमय भूतकाळ.
आता प्रश्न असा – मोहब्बत काय हवी आहे? आणि बाबा खरंच मदत करायला आलाय, की तोच आहे असली गेमप्लॅन?
थिएटरमध्ये चुकवलं का? काही नाही झालं – आता घरबसल्या होणार भयमिश्रित धमाल! ‘द भूतनी’ स्ट्रीम होईल १८ जुलैपासून रात्री ८ वाजता – ZEE5 आणि Zee Cinema वर!
संजय दत्त म्हणाले, “‘द भूतनी’ ही खरंच एक हटके, धमाल आणि वेगळी फिल्म आहे. थिएटरमध्ये ती थोडी कमी स्क्रीन्समध्ये हरवली, पण आम्ही मनापासून बनवली आहे. ZEE5 आणि Zee Cinema वर ती नक्की आपल्याला हसवेल आणि थोडंसं घाबरवेलही!”
मौनी रॉय म्हणाल्या, “‘मोहब्बत’ हे पात्र खूपच वेगळं होतं – भावनांनी भरलेलं, सस्पेन्स आणि थोडंसं भयानकही! संजय सरसोबत काम करणं म्हणजे एक मोठा अनुभव होता. सिद्धांतने माझ्यावर विश्वास टाकला यासाठी मी कायम ऋणी राहीन.”
सनी सिंग म्हणाले, “शांतनू म्हणजे एक सामान्य मुलगा – पण अडकतो थेट भूतांच्या गोंधळात! या सिनेमात हॉरर आणि विनोदाचा जबरदस्त तडका आहे. संजय सर, मौनी आणि पलक यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक धमाल प्रवास होता!”
पलक तिवारी म्हणाल्या, “अनन्या ही पात्र हुशार, धाडसी आणि खूप वेगळ्या परिस्थितीत सापडलेली. सेटवर खूप मजा आली. संजय सरकडून खूप शिकायला मिळालं. आणि सिद्धांत सरचं दिग्दर्शन म्हणजे टोटल गाइडन्स!”
कावेरी दास (बिझनेस हेड – हिंदी, ZEE5) म्हणाल्या, “आम्ही ‘द भूतनी’ च्या माध्यमातून आमच्या हिंदी कंटेंटमध्ये एक मजेदार, तरुणाईला भिडणारं हॉरर-कॉमेडी अॅड करत आहोत – जिथे भयानक गोष्टींपेक्षा अधिक धमाल आहे!”
दीपक मुकुट म्हणाले, “‘द भूतनी’ म्हणजे भन्नाट गोंधळ, हसवा-हसवी आणि थोडंसं झकास भय – असंच काहीसं बनवायचं होतं. संजय दत्त, मौनी, सनी आणि पलकने त्यात जीव ओतला आणि सिद्धांतने एक धमाकेदार जग तयार केलं!”