सातारा : सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरुन नेल्या आहेत. लिंब व अंगापूर येथे या घटना घडल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब ता.सातारा येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 सीएन 4408 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 18 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी सुरज चंद्रकांत चोरट (वय 26, रा. लिंब) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दुसरी तक्रार बबन मनोहर जावळे (वय 52, रा. कटापूर ता.कोरेगाव) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 21 मार्च रोजी अंगापूर येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 एवाय 8144 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली आहे.