सातारा : अपघात प्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सचिन लक्ष्मण पवार यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एमएच 11 सीएक्स 0391 ला धडक देऊन अपघात करून पवार यांच्यासह त्यांच्या पत्नीस जखमी केल्याप्रकरणी ईरटीका कार क्र. एमएच 12 एनई 1768 वरील चालक सचिन भगवान कांबळे रा. आसगाव ता. सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.