सातारा : विनापरवाना फ्लेक्स लावल्या प्रकरणी एकाला सातारा शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी रविवार पेठ, पोवई नाका, सातारा येथील डीसीसी बँकेच्या कोपऱ्यावर विनापरवाना वाढदिवस शुभेच्छा फ्लेक्स बोर्ड लावल्याप्रकरणी यशवंत सदाशिव चव्हाण रा. करंजे, सातारा यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.
विनापरवाना फ्लेक्स लावल्या प्रकरणी एकाला नोटीस
by Team Satara Today | published on : 02 December 2024