सातारा : सातारा शहरासह तालुक्यातील दोनजणांविरोधात जुगार प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटखळ ता.सातारा येथे जुगार प्रकरणी सागर उत्तम पाटील (वय 25 रा. कराड) याच्यावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम 950 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. दि. 26 ऑगस्ट रोजी ही कारवाई झाली आहे.
दुसर्या कारवाईत, सातारा शहर परिसरातील शिवराज पेट्रोलपंप येथे जुगार प्रकरणी शिवराज मानसिंग रजपूत (वय 35, रा. सदरबझार) याला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 620 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.