मुंबई : बिग बॉसच्या घरात नुकताच बीबी करन्सीसाठी टास्क पार पडला. यामध्ये सदस्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. टीम A आणि टीम B मध्ये फुल ऑन बाचाबाची झाली. यावेळी जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली. जान्हवीने पॅडीबद्दल लाजिरवाणं भाष्य केलं. पॅडीवर टीका करताना जान्हवीने पातळी सोडली, यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. नेटकऱ्यांनी जान्हवीला चांगलंच निशाण्यावर धरलं आहे. टीकांचा भडीमार सहन करणाऱ्या जान्हवीसाठी आता नवरा मैदानात उतरला आहे.
पॅडीबाबत लाजिरवाणं भाष्य केल्यानंतर जान्हवीवर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरु आहे. त्यानंतर आत जान्हवीसाठी नवरा मैदानात उतरला आहे. ट्रोलर्सने निशाण्यावर धरल्यानंतर जान्हवीच्या पतीची प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉस मराठी घरातील घडामोडींवर जान्हवी किल्लेकरच्या पतीने अधिकृत निवेदन जारी केलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त घटनांवर, जान्हवी किल्लेकरच्या पतीने यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरात बीबी करन्सीसाठी 'सत्याचा पंचनामा' टास्क पार पडला. टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेच्या करिअरबाबत लाजिरवाणं वक्तव्य केलं. जान्हवीने म्हणाली की, 'हे सर्व लोक घाणेरडे आहेत, समोर येऊन बोलण्याचा दम नाहीये. यांना फक्त अॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले म्हणून ती अॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.' यानंतर आर्या जान्हवीला टोकते, पण ती तिलाही हड-तूडची भाषा करते.