सातारा : क्षेत्र माहुली येथे उभ्या असलेल्या दुचाकी गाडीवर कुत्र्याने लघुशंका केली म्हणून एकास लाकडी दांडक्याने पाठीवर आणि हातावर मारहाण केल्या प्रकरणी किरण विजय पवार (रा. क्षेत्र माहुली सातारा) याच्या विरोधात नंदकुमार गणपत पवार (वय ६२ वर्ष राहणार क्षेत्र माहुली सातारा) यांनी फिर्यादी दिली आहे.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) ३५२ प्रमाणे दिनांक ६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील तक्रारदार आणि आरोपी यांचे नाते काका-पुतण्याचे आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देखणे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे